Stock Market | शेअर मार्केटचा नवा विक्रम, निर्देशांक पहिल्यांदाच 52 हजारांच्या पार

Continues below advertisement
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर मुंबई शेअर मार्केटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 359.87 अंकाची म्हणजे 0.70 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आले. त्यामुळे शेअर मार्केटचा निर्देशांक पहिल्यांदाच 52 हजारांच्या पलिकडे गेला आहे. निफ्टीही 107 अंकानी वाढून 15,297.10 अंकावर पोहचली आहे. शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, परदेशी शेअर मार्केटमध्ये तेजी पहायला मिळाल्याने त्याचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवरही झाल्याचं दिसून आलंय. केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम झाला असून सातत्याने दुसऱ्या आठड्यात शेअर मार्केट वधारल्याचं दिसून येतंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram