Social Media, OTT Rules | सोशल मीडिया, ओटीटीसाठी केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स जारी, काय आहे नियमावली?

Continues below advertisement
केंद्र सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यापुढे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराला केंद्र सरकारकडून मंजुरी दिला जाणार नाही, असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी तीन महिन्यात करावी लागणार आहे.


हिंसा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की सोशल मीडियावर चुकीची भाषा वापरली जात आहे. फेक न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. हिंसा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मात्र यापुढे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराला केंद्र सरकारकडून मंजुरी दिला जाणार नाही. इंटरमिडरी आणि सिग्निफिकंट अशा दोन भागांमध्ये सोशल विभागलं जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram