New Financial Year Inflation : नवीन आर्थिक वर्ष महागाईचं, कोण कोणत्या गोष्टी महागल्या? ABP Majha
Continues below advertisement
आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात... पण या नव्या आर्थिक वर्षात तुमच्या खिशाला महागाईची फोडणी बसणार आहे. कारण आता नवी घरं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, गुंतवणूक, मोबाईल, हे सारं काही महागणार आहे... अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवे कर आजपासून लागू होत आहेत. नवं घर खरेदी करतानाही जरा अधिकचा खिसा मोकळा करावा लागेल कारण दोन वर्षांनंतर रेडी रेकनरचे दर वाढले आहेत. तसंच मोठ्या शहरात नव्या घरांवर मेट्रोचा सेस लागणार आहे.. त्यामुळे नव्या घरांच्या किमीती वाढणार आहेत. आजपासून लागू होणाऱ्या नव्या आयात शुल्कामुळे टीव्ही, फ्रिज, एसी, मोबाईल, हेडफोन्स, एलईडीबल्ब यांच्या खरेदीमुळे खिशाला कात्री लागणार आहे. चांदीवरील आयात शुल्कात बदल झाल्यानं चांदीची भांडी, दागिने महाग होणार आहेत..
Continues below advertisement