Nirbhaya Case | 22 तारखेच्या फाशीची अंमलबजावणी थांबवा, आरोपीची क्युरेटिव्ह पिटीशन | ABP Majha
22 जानेवारीच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थांबवा, अशी क्युरेटिव्ह पिटीशन दोषी विनय शर्माने सुप्रीम कोर्टात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांच्या फाशीच्या अंमलबजावणीसाठी डेथ वॉरंट जारी केलं. त्याच्या विरोधात क्युरेटिव्ह पिटीशन करुन विनय शर्माने बचावाचा अखेरचा प्रयत्न केला आहे. जेव्हा राष्ट्रपतींकडून दयेचा अर्ज आणि सर्वोच्च न्यायालयाकडून पुर्नविचार याचिका जेव्हा फेटाळली जाते, त्यानंतर अंतिम पर्याय म्हणून आरोपी बचावासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका करतात. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळल्यानंतर आरोपीच्या शिक्षेची अंमलबजावणी ही अटळ असते.