Monsoon Forecast | शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस : हवामान विभाग
Continues below advertisement
देशातील शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा मान्सून सामान्य असेल. यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात 96 ते 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला.
Continues below advertisement