Farmers Protest | 6 मार्चला केएमपी एक्सप्रेसवेवर शेतकऱ्यांचं आंदोलन
केंद्राच्या ३ कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाला येत्या 6 मार्चला 100 दिवस पूर्ण होणार आहे. या दिवशी दिल्लीतील केएमपी एक्सप्रेस वे शेतकऱ्यांकडून 5 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या एक्सप्रेसवेवर शेतकरी आंदोलन करणार आहे. या दिवशी घरांवर, कार्यालयांवर काळे झेंडे लावण्याचं आवाहनही देशवासियांना शेतकऱ्यांनी केलंय. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात 15 मार्चला मजूर आणि कर्मचारी रस्त्यांवर, रेल्वे स्थानकावर आंदोलन करणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या योगेंद्र यादवांनी दिलीय.