Adar Poonawalla : भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत, सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

Continues below advertisement

नवी दिल्ली : देश सध्या कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या कचाट्यात सापडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनामुळे दररोज 4 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामुळेच लसीची मागणीही वाढत आहे. अनेक राज्य सरकार लस नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ, अद्दार पूनावाला यांनी एक निवेदन जारी केले आहे की, भारत हा एक मोठा लोकसंख्या असलेला देश आहे आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला 2-3 महिन्यांत लसीकरण करणे शक्य नाही. सोबतचं आम्ही भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत, संपूर्ण भारताचं लसीकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे स्पष्टीकरणही सीरम इन्स्टिट्यूटने दिलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram