ABP News

Padma Awards : 'अशीच मेहनत करत राहीन,' पद्मश्री आणि सेवापदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राची प्रतिक्रिया

Continues below advertisement

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दुहेरी सन्मान होतोय. नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, याशिवाय राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या वीरता पुरस्कारांमध्येही नीरज चोप्राला परमविशिष्ट सेवापदक जाहीर झालंय. भारतीय सैन्यात सेवेत असलेला नीरज चोप्रा राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहे. याआधी त्याचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानंही गौरव करण्यात आला आहे. सध्या नीरज अमेरिकेमध्ये कसून सराव करत आहे. पदक मिळाल्यानंतर तिथूनच त्यानं प्रतिक्रिया दिलीय.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram