Hyderabad Rapist Encounter | हैदराबाद प्रकरणातील दोषींचा खात्मा योग्यच : रेखा शर्मा | ABP Majha
Continues below advertisement
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा मृत्यू झाला. तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चारही जणांचा खात्मा केला. हैदराबाद पोलिस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चारही आरोपी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत होते. 4 डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असं चारही आरोपींची नावं आहेत.
Continues below advertisement
Tags :
NCW Chief Rekha Sharma Breaking News In Hyderabad Rape Murder Case Hyderabad Crime News Hyderabad News Hyderabad Rape And Murder Case Hyderabad Rapist Encounter Telangana Doctor Hyderabad Police Big Reveal In Hyderabad Murder Case