Naxal in Kisan Morcha : गेल्यावर्षीच्या किसान मोर्चात नक्षलींचा नेता; भक्कम पुरावा समोर

Continues below advertisement

Naxal in Kisan Morcha : गेल्यावर्षीच्या किसान मोर्चात नक्षलींचा नेता; भक्कम पुरावा समोर  दिल्लीत विविध मागण्यांसाठी किसान मोर्चा दिल्लीच्या वेशीवर आहे...  शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात नक्षलवादी  शिरल्याचे गोपनीय माहिती त्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी दिले होते... मात्र, तेव्हा अनेकांनी गुप्तहेर यंत्रणांनी प्रोपौगंडा असल्याचं सांगत शेतकरी आंदोलनात नक्षलवाद्यांचा शिरकाव नसल्याचा दावा केला होता... मात्र, आता खुद्द नक्षलवाद्यांनीच शेतकरी आंदोलनात त्यांची माणसे असल्याचा भक्कम पुरावा दिला आहे... 
गेल्यावेळी झालेल्या शेतकरी आंदोलनात दर्शपाल सिंह हा किसान मोर्चाचा नेता सहभागी झाला होता... दर्शनपाल सिंह नक्षलवाद्यांचा केंद्रीय कार्यकारिणीत कार्यरत होता.. मात्र, तो नक्षलवाद्यांच्या अपेक्षेप्रमाणे आंदोलनात तीव्रता आणू शकला नाही, या आरोपाखाली त्याला नक्षलवाद्यांच्या कार्यकरिणीतून बरखास्त करण्यात आलं. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने जानेवारी महिन्यात खुद्द एक पत्रक काढून दर्शनपाल आणि इतर काही कॉम्रेडच्या हकालपट्टीची माहिती दिली आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram