छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षली हल्ला, पाच जवान शहीद, 12 जवानांवर उपचार सुरू, 7 जवान गंभीर
रोमित तोंबर्लावार, एबीपी माझा
Updated at:
04 Apr 2021 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांचे 12 जवान जखमी झाले आहेत. या ठिकाणी एका नक्षलवादी महिलेचे प्रेत सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं.