नौदल अधिकाऱ्यासह 3 जणांना CBI कडून अटक; गोपनीय माहिती 'लीक' केल्याप्रकरणी कारवाई
गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी नौदलाचा कमांडर दर्जाचा अधिकारी आणि दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सीबीआयनं अटक केलीय. किलो-क्लास पानबुडीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे. सध्या सेवेत असलेला मुंबई स्थित नौदल अधिकारी दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना माहिती लीक करत होता. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर सीबीआयनं कारवाई सुरू केली. या प्रकरणाची व्हाईस अॅडमिरलमार्फत चौकशी करण्याचे आदेेश नौदलानं दिले आहेत.