Corona Vaccine Dry Run | कोरोना लसीकरणाचं आज देशव्यापी ड्राय रन, राज्यातील 30 जिल्ह्यात रंगीत तालीम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2021 10:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ज्यानंतर आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास सुरुवात होणार आहे. यापूर्वी लसीकरणाची रंगीत तालीम, अर्थात ड्राय रन संपूर्ण देशात पार पडत आहे. महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे.