भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा

Continues below advertisement

National Unity Day 2021 : कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 145 वी जयंती आहे. देशभरात हा दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. याचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी व्हिडिओ संदेश जारी केलाय. नमस्कार ! राष्ट्रीय एकता दिवसाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा! 'एक भारत, श्रेष्ठ भारत' यासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करणारे सरदार वल्लभाई पटेल यांना देशभरातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. सरदार पटेल फक्त इतिहासातच नाही तर सर्व भारतीयांच्या हृदयातही आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये जी-20 शिखर संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे ते गुजरातमधील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram