Khalistani : NIA कडून 19 खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त होणार

Continues below advertisement

कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या झाल्यानंतर कॅनडा आणि भारताचे संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले आहेत. या पार्श्वभूमीवर एनआयएने १९ फरार खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. एनआयएच्या यादीत समावेश असलेल्या सर्व दहशतवाद्यांनी ब्रिटन, अमनेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या भारतातील मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. एनआयएने 'सिख फॉर जस्टिस'  या भारतातील प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram