Naseeruddin Shah: 'मुघल अत्याचारी नव्हे, राष्ट्रनिर्माते' नसिरुद्धीन शाह यांचं वक्तव्य ABP Majha
मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होेते, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे. मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण देशात 20 कोटी मुस्लिम आहेत, ते घाबरणार नाहीत तर लढतील, असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी हरिद्वार इथली धर्मसंसद वादग्रस्त वक्तव्यानं गाजली. यासंदर्भात एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हे वक्तव्य केलं. देशात एका प्रकारे गृहयुद्धसारखं वातावरण निर्माण केलं जात असल्याचंही नसिरुद्दीन शाह म्हणालेत. नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Tags :
Aggressive Haridwar Nasiruddin Shah Controversial Mughal Fear Atrocities Statements Nation Builders Veteran Actors Dharmasansad