Narendra Modi Oath Breaking News : नरेंद्र मोदी 9 जून रोजी घेणार पंतप्रधान पदाची शपथ

Continues below advertisement

नरेंद्र मोदी 9 जून रोजी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता हा शपथविधी सोहळा होईल.

संसदेत सध्या एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान नरेंद्र मोदी यांची गटनेता म्हणून निवड केली जाणार आहे. सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे भाषण करत आहेत.

एनडीए आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. आज एनडीएची नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला एनडीएमधील पक्षांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. तसंच एनडीए खासदारांचीही आजच बैठक आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडलं जाणार आहे. सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक होतेय. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडतील. बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीत दिल्लीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या  बैठकीला उपस्थित आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram