Vaccine : भारतात 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केली जात होती. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट साध्य झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement