2002 Gujarat Riots | 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट | ABP Majha
2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी न्यायमूर्ती नानावटी-मेहता आयोगाने नरेंद्र मोदी यांनी क्वीन चिट दिली आहे. या दंगलीचा अंतिम अहवाल आज गुजरात विधानसभेत सादर करण्यात आला. त्यात 'ही दंगल पूर्वनियोजित नव्हती' असा उल्लेख करण्यात आला आहे. नानावटी आयोगाने नरेंद्र मोदी आणि इतर सर्व मंत्र्यांनाही क्लीन चिट दिली आहे. गुजरात दंगल झाली त्यावेळी म्हणजेच 2002 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला लागलेल्या आगीतल 58 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती.