Nadda Convoy Attack | जे. पी. नड्डा यांच्यावरील हल्ल्यानंतर बंगालमध्ये राजकारण तापलं; भाजप आक्रमक

Continues below advertisement

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नड्डा यांच्या गाडीवर काल दगड फेकण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आज मुंबईमध्ये भाजपचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला. तिकडे बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी पत्रकार परिषद घेऊन बंगालच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये कायदा व्यवस्था खूप खराब आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था नव्हती. कायदा व्यवस्थेसंदर्भात याप्रकरणी राज्याचे मुख्य पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांना समन्स पाठवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा
मुंबईमध्ये भाजपचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला. खार पश्चिम मधील शिवराज हाईट या आपल्या निवासस्थानाबाहेर भाजपचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी काळे झेंडे दाखवून ममता बॅनर्जी सरकारचा निषेध करण्यात आला. ममता हटाव बंगाल बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन राम कदम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले. राज्यपालांना भेटून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राम कदम यांच्या सोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram