ensex Crosses 50,000 | शेअर बाजाराची विक्रमी भरारी; Sensex नं 50 हजार तर Nifty 14 हजार पार
Continues below advertisement
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सकारात्मक बदल यामुळे भारतीय शेयर बाजाराने एक नवा विक्रम रचला आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 50,000 चा टप्पा पार केला आहे. देशाच्या शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदाच असे घडले असून गुंतवणूकदारांसाठी ही एक नवी संधी आहे. सकाळी नऊ वाजून 24 मिनीटांनी सेन्सेक्स 266.96 अंकानी उसळला आणि 0.54 टक्क्यांनी वाढून तो 50,059.08 वर पोहचला आहे. मुंबई शेअर मार्केटमधील टॉप 50 शेअर्स असणारा इंडेक्स निफ्टी 79.10 अंकानी उसळला. त्यातही 0.54 टक्क्यांची जबरदस्त तेजी पहायला मिळाली. निफ्टीनेही 14,723.80 चा टप्पा गाठला आहे.
Continues below advertisement