Mumbai Local Resume | मुंबई लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ,सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय नाही
लोकलच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सुरू असलेल्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून अधिकच्या लोकल सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आह. मात्र सोशल मीडियावर याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊन 29 तारखेपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी देखील लोकलसेवा सुरू होणार असल्याचे पसरवले जात आहे. त्यामुळे असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे रेल्वेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मिळून 2781 लोकल सेवा चालवला जात आहेत. त्यात वाढ करून 29 जानेवारीपासून 2985 लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मध्य रेल्वेवर धावत असलेल्या 1580 लोकल सेवा वाढवून त्या 1685 करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील 1201 लोकल सेवांमध्ये वाढ करून आता 1300 लोकल सेवा चालवल्या जातील. लोकल मधील वाढत चाललेल्या गर्दीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.