Monsoon 2021 : आनंदाची बातमी! केरळात मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रात प्रतिक्षा

Monsoon 2021 : आनंदाची बातमी! केरळात मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रात प्रतिक्षा

सामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देवभूमी केरळमध्ये मान्सूनने (Monsoon) वर्दी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने ट्विटरवरुन याची माहिती दिली. केरळच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. अखेर वरुणराजाने केरळात बरसायला सुरुवात केली आहे. यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola