
Monsoon Forecast | यंदा 1 जूनला मान्सूनचं केरळमध्ये आगमन होणार; हवामान विभागाचा अंदाज
Continues below advertisement
यंदा 1 जूनला नैऋत्य मान्सून केरळमध्ये पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी दक्षिण-पूर्वेकडील आणि पूर्वेकडील मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी मान्सून लवकर केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Continues below advertisement