Moloy Ghatak CBI Raid : ममता सरकारचे कायदा मंत्री मलय घटक यांच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

Continues below advertisement

ममता सरकारचे कायदा मंत्री मलय घटक यांच्या सहा ठिकाणांवर सीबीआयने बुधवारी सकाळी छापे टाकलेत. घटक यांच्यावर कोळसा तस्करीचा आरोप आहे. सीबीआयची ३ पथके सकाळी ८ वाजल्यापासून घटक यांच्या निवासस्थानासह ६ ठिकाणी शोध घेत होती. त्यापैकी कोलकात्यात ५ आणि आसनसोलमधील एका ठिकाणी पथक उपस्थित होतं. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, अनेक नोटिसा पाठवूनही मलय चौकशीसाठी आले नाहीत, त्यामुळे हा छापा टाकण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram