PM Modi : Narendra Modi यांची वाराणसीत Cruise सफर, संध्याकाळी 6 वाजता गंगा आरतीला राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण होणार आहे. दुपारी 12 वाजता अध्यात्मिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर 1  वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल तर संध्याकाळी 6 वाजता मोदी गंगा आरतीला उपस्थिती लावतील. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी वाराणसी नगरी सजलीय. मोदींच्या स्वागतासाठी काशी विश्वनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. काशी विश्वनाथ कॉरिडोर लोकार्पणचा हा सोहळा जवळपास तीन तास चालणार आहे. या सोहळ्या दरम्यान आतषबाजी, लेजर शो आणि दीपोत्सवही पाहायला मिळणार आहे. 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वननाथ कॉरिडोरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर दोन वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत या कॉरिडॉरचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. यासाठी 445 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola