Modi Cabinet Portfolio : मोदी कॅबिनेटचं खातेवाटप; गडकरींकडे रस्ते आणि परिवहन मंत्रालय

Continues below advertisement

नवी दिल्ली : मोदी कॅबिनेटचा शपथविधी पार पडल्यानंतर आज खातेवाटप जाहीर (Modi Cabinet Portfolio) करण्यात आलं आहे. अमित शाह यांच्यावर पुन्हा एकदा गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं. त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram