
Shripad Naik Accident | केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू
Continues below advertisement
अंकोला : केंद्रीय केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा देखील मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोलाजवळ हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारला अपघात झाला. कारमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह चार व्यक्ती होत्या. अपघातानंतर जवळील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली आहे.
Continues below advertisement