Hurricane Michong : मिचाँग चक्रीवादळाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, अनेक भागांमध्ये पीकं पाण्याखाली
Continues below advertisement
बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं मिचाँग चक्रीवादळ उद्या आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. या वादळी वाऱ्यांचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय. हवामान विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बंगालच्या उपसागरावरील र्नैऋत्य भागातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पुढील १२ तासांत चक्रीवादळ तीव्र होईल आणि ५ डिसेंबरच्या दुपारपर्यंत तमिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचणार आहे.
Continues below advertisement