पूर्वांचल एक्सप्रेस वे वर 'मेगा शो', लढाऊ विमानांचं लॅन्डिंग
उत्तर प्रदेश आणि पूर्वांचलमध्ये राहाणाऱ्या नागरिकांना लवकरच लढाऊ विमानांचे जोरदार आवाज ऐकू येणार आहेत. नाही. युद्ध वगैरे सुरु होणार नाही.. तर योगी सरकार आणि हवाई दलाने मिळून नव्यानं तयार करण्यात येत असलेल्या पूर्वांचल एक्सप्रेस वे वर एका मेगा शो चे आयोजन केले आहे.त्याचाच आवाज नागरिकांना ऐकू येणार आहे