Faemer Protest | सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये गेल्या तीन तासांपासून बैठक
दिल्लीतील शेतकरी आंदोनातील नेते सरकारसोबत चर्चा करत आहेत. केंद्र सरकारसोबत शेतकरी नेत्यांचा चर्चेचा सातवा टप्पा आहे. शेतकरी नेते आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात विज्ञान भवनमध्ये चर्चा सुरु आहे. या चर्चेत काय तोडगा निघतो की बैठक पुन्हा निष्फळ होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी आशा व्यक्त केली की, आजच्या बैठकीनंतर शेतकरी आंदोलन संपेल आणि सर्व शेतकरी बांधव आपल्या कुटुंबियांसोबत नव्या वर्षाचं स्वागत आनंदात करतील.