Shri Krishna Janmabhoomi case | मथुरेत कृष्ण जन्मभूमीवर नवा वाद निर्माण होणार?
अयोध्येनंतर मथुरेत नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीसंदर्भात दाखल याचिकेवर 30 सप्टेंबर रोजी (बुधवारी) सुनावणी होणार आहे. सोमवारी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार होती. परंतु, याचिकाकर्ते सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे श्रीकृष्ण विराजमानच्या याचिकेबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मथुरेत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
श्रीकृष्ण विराजमान, स्थान श्रीकृष्ण जन्मभूमी आणि इतरही अनेक लोकांनी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दावा केला आहे की, 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ (सध्याचं श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान) आणि शाही इदगाह मशिद यांच्यात जमिनीसंदर्भात करार झाला होता. यामध्ये निश्चित करण्यात आलं होतं की, जेवढ्या जागेत मशीद बांधण्यात आली आहे, तेवढ्याच जागेवर कायम राहिल. परंतु, 1968 मध्ये मथुरा न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.