Maratha Reservation साठी महत्त्वाचा दिवस, SEBC आरक्षणाशी संबंधित 127वं घटनादुरुस्ती विधेयक मांडणार
लोकसभेत आरक्षणाशी संबंधित महत्वाचं विधेयक मांडलं जाणार आहे. या १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे नव्या प्रवर्गांचा एसईबीसीच्या यादीत समावेश करण्याचे अधिकार राज्यांना दिले जाणार आहेत. मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं हे विधेयक महत्वाचं मानलं जातं. १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर एसईबीसीच्या यादीत नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचे अधिकार राज्यांना नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्यामुळे घटनादुरुस्ती करून आता हे अधिकार राज्यांना दिले जाणार आहेत.
Tags :
Maratha Reservation Loksabha Maratha Aarakshan SEBC 127 Amendment 127th Constitutional Amendment Bill