Mann Ki Baat | PM Modi | भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी आज संवाद साधला. ते म्हणाले की, मजुरांना काम देण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. आता स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीनं काम सुरू झालं आहे. घरी परतणाऱ्या मजुरांना काम मिळावं म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. कोरोनाच्या काळातही मन की बात सुरूच राहिली. आता अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. श्रमिक रेल्वे, विमान सेवा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता अधिक सर्तक राहण्याची गरज आहे. देशात कोरोनाविरोधातील लढाई मजबूत लढवली जात आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.