PM Modi Mann Ki Baat | 'कोरोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही सुरुवातीएवढाच घातक' : पंतप्रधान मोदी

कोरोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टी पुढे आल्या आहेत. मात्र अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही तेवढाच घातक जेवढा तो सुरुवातीला होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा, असंही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनी कोरोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारत बनवण्याचा आणि नाविण्यपूर्ण कामे करण्याचा संकल्प करूया, असंही मोदी म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola