Manmohan SIngh to PM Modi | पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे- मनमोहन सिंग
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावरुन भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना सल्ला दिला आहे. "आपल्या लोकशाहीची जबाबादारी पंतप्रधानांवर आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे," असं मनमोहन सिंह म्हणाले. यासंदर्भात मनमोहन सिंग यांनी आज पत्रक जारी केलं आहे.
मागील आठवड्यात सोमवारी (15 जून) रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत एका कर्नलसह भारताचे 20 जवान शहीद झाले होते तर चीनचेही 40 सैनिक ठार झाल्याचं समजतं.