Manmohan Singh 1984 Riots | ...तर, शिख दंगली झाल्या नसत्या; माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांचा खुलासा | ABP Majha
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984 साली झालेल्या शिख दंगली संदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. तत्कालीन गृहमंत्री नरसिम्हा राव यांनी इंद्र कुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर, या दंगली रोखता आल्या असत्या, असा दावा मनमोहन सिंग यांनी केला आहे. शिख दंगलीवरुन नेहमीच काँग्रेसवर आरोप केले जातात. आता काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबद्दल वक्तव्य केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.