Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार ABP Majha
देशभरातल्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी दिल्ली दौरा करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता ३० नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहेत. या दौऱ्यात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्या भेटणार आहेत. ममता बॅनर्जी ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला महाराष्ट्रात असतील.