Mamata Banerjee : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव पुढे, खरगेंनी नाकारली ऑफर

Mamata Banerjee :  इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव पुढे, ममता बॅनर्जींचा प्रस्ताव, खरगेंनी ऑफर नाकारली 
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं नाव जाहीर करा असा प्रस्ताव ममता बॅनर्जींनी मांडला. त्याला आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही पाठिंबा दिला. मात्र खरगेंनी या प्रस्तावाला नकार दिला. पंतप्रधानपदाचं लोकसभा निवडणुकीनंतर पाहू असं खरगे म्हणाले.  दरम्यान इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून खरगेंनी जबाबदारी घ्यावी असं त्यांना सुचवण्यात आलं. त्याला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून काँग्रेस अध्यक्ष खरगेंची घोषणा करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola