Mamata Banerjee : राष्ट्रपतीपदासाठी ममता बॅनर्जी यांनी बोलावली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झालेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीत विरोधी पक्षाच्या २२ नेत्यांची बैठक बोलावलीय. यासाठी त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह २२ नेत्यांना पत्र लिहिलंय. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यातच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून या बैठकीला कोण उपस्थित राहणार याकडं लक्ष लागलंय. या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार कोण असेल यावर चर्चा होणार आहे.