Malegaon Blast Verdict | १७ वर्षांनंतर आज फैसला, Pragya Singh Thakur सह ७ आरोपींचा निकाल

मालेगाव स्फोटाचा १७ वर्षांनंतर आज निकाल लागणार आहे. २००८ च्या या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. विशेष NIA कोर्ट आज या खटल्याचा निर्णय देणार आहे. निवृत्त Major Ramesh Upadhyay सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. Pragya Singh Thakur, Prasad Purohit यांच्यासह सात आरोपींचा आज फैसला होणार आहे. सकाळी अकरा वाजता कोर्टात निकालाचे वाचन सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने अनेक चढ-उतार पाहिले, दोन तपास यंत्रणा आणि अनेक तपास अधिकारी बदलले. २०१८ मध्ये आरोप निश्चिती झाल्यानंतर जवळपास सात वर्षे हा खटला चालला. १९ एप्रिलला खटला पूर्ण होऊन कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. "काय नेमका कोर्टात फैसला सुनवतो त्याकडे केवळ राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष असेल."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola