Maharashtra Karnataka Border Dispute :अमित शाहांच्या उपस्थितीत शिंदे-फडणवीस आणि बोम्मई यांच्यात बैठक

Continues below advertisement

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी  (Maharashtra Karnataka Border Dispute) आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde)  यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram