Madhya Pradesh : लस घेतली नसेल तर लग्नात जेवण मिळणार नाही ABP Majha
Continues below advertisement
फरसाण उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रतलाममधून एक वेगळी बातमी... कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम शेवटच्या माणसापर्यंत राबवणं गरजेचं आहे. त्यात आता हेच लसीकरण गांभीर्यानं घेण्यासाठी मध्य प्रदेशातील रतलामवासीयांनी नामी शक्कल लढवलीए. आता लग्नसोहळ्यात जर कुणी लस घेतलेली नसेल तर त्यांना जेवण मिळणार नाही. त्यामुळे लग्नात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना आधी लस घ्यावी लागणार आहे. याशिवाय फरसाण दुकानदारांनीही लस घेतली नसेल तर त्या ग्राहकाला फरसाण विकणार नाही असा निर्णय घेतलाय. थोडं नुकसान झालं तरी चालेल पण, लसीकरणासाठी जनजागृती करण्याचा निर्णय रतलामवासीयांनी घेतला आहे.
Continues below advertisement