Madhya Pradesh : मध्य प्रदेशची लिस्ट, भाजपमध्ये ट्विस्ट, दोन याद्या जाहीर
MP BJP Candidates List : मध्य प्रदेशात भाजपनं 39 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे विधानसभेसाठी तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळे भाजपची मध्य प्रदेशातली ही यादी अस्वस्थता दाखवते की निवडणूक रणनीतीतली गंभीरता, कठोरता दाखवते याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे दोन याद्या जाहीर झाल्या तरी मुख्यमंत्री शिवराज सिंह (Shivraj Singh Chouhan) यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे भाजप त्यांना उमेदवारी देणार की त्यांचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.