Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?

Continues below advertisement

Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?

नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर, विरोधी पक्षांकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी मांडलेला ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानानं स्वीकारण्यात आल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी केली. यानुसार 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी  ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत पोहोचवलं.   

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचं नाव अध्यक्षपदासाठी मांडलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधारी एनडीएच्या 13  घटक पक्षांनी देखील प्रस्ताव मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, जीतनराम मांझी, कुमारस्वामी, चिराग पासवान,सुनील  तटकरे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी  यांनी ओम बिर्ला यांच्या अर्जाला अनुमोदन दिलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram