coronavirus lockdown | पंतप्रधान मोदींकडून लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येते आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असं जवळपास सर्वच विरोधी पक्षीय नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या काही सूचना मिळत आहेत, त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने झुकतं माप आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.