Lockdown | मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत, केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Continues below advertisement
 देशभरात लॉकडाऊनमध्ये  केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे.
महत्वाचं म्हणजे या सवलती हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू नाहीत.  आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला अशीच दुकानं सुरू होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram