Lockdown 3 | तेलंगणामध्ये लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवला!

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी (5 मे) राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी 29 मे पर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. देशभरात सध्या 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आपल्या राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवणारं तेलंगणा हे पहिलचं राज्य ठरलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, "राज्यात सात वाजल्यापासून संचारबंदी लागू केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी सहा वाजेपर्यंत आवश्यक वस्तू खरेदी करुन घरी जावं." तेलंगणा सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी दिवसात केंद्र सरकारही लॉकडाऊनची मर्यादा वाढवू शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola