Liquor Price : महाराष्ट्रानंतर भाजपशासित राज्यात दारु स्वस्त, मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय
Continues below advertisement
महाराष्ट्रानंतर आता भाजपशासित मध्य प्रदेशमध्येही दारु स्वस्त होणार आहे. कारण तिथल्या शिवराजसिंह चौहान सरकारनं विदेशी दारुवरील कर 10 टक्क्यांनी कमी केलाय. त्यामुळे मध्य प्रदेशात दारुची बाटली 50 ते 500 रुपयांनी स्वस्त होणार आहे. 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत. मध्य प्रदेश सरकारनं दर घटवल्यानं 110 रुपयांना मिळणारी दारू आता 85 रुपयांना मिळणार आहे. शिवराजसिंह चौहान सरकारनं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या दारू धोरणाला मंजुरी दिली. त्याच हेरिटेज दारु बनवण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आदिवासी मोहापासून दारु बनवून विकू शकतील. नव्या दारू धोरणानुसार वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेली व्यक्ती 50 हजार रुपये भरून स्वतःसाठी घरीच बारचा परवाना घेऊ शकेल. शिवाय घरी दारु ठेवण्याची मर्यादा चारपटींनी वाढवण्यात आलीय.
Continues below advertisement