Lightning Strikes : राजस्थान आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून तब्बल 50 जणांचा मृत्यू
राजस्थान आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून तब्बल 50 जणांचा मृत्यू झालाय. राजस्थानातल्या जयपूरमध्ये आमेर महलाच्या टॉवरवर वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू झालाय. तर उत्तर प्रदेशात चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाज आणि कानपूर अशा वेगवेगळ्या ठिकणी वीज कोसळून 30 जणांचा मृत्यू झालाय. राजस्थानातली घटना ही आजवरची सर्वात धक्कादायक घटना मानली जातेय. मुसळधार पाऊस सुरु असताना अनेक जण सेल्फीसाठी टॉवरवर चढले होते. यावेळी टॉवरवर वीज कोसळली. आणि सेल्फीसाठी टॉवरवर चढलेले लोक वीजेच्या धक्क्यानं आजबाजूच्या जंगलात उडाले.
Tags :
Rajasthan Uttar Pradesh UP Lightning Strikes Sky Lighting Sky Lighting In Uttar Pradesh Sky Lighting In Rajasthan